कायदा आंधळा आहे (Law is not blind) हि संकल्पना बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदललाय..! ब्रिटीशांच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेतील बहुतांश कायदे रोमन संस्कृतीतील प्रतीकांच्या आधारे तयार करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू आणि तलवार असणारी रोमन पोशाखातील न्याय देवता 'लेडी जस्टिशिया'ची मूर्ती भारताची न्यायादेवता म्हणून स्विकारण्यात आली. त्या न्याय देवतेची डोळ्यावर पट्टी, उजव्या हातात तराजू, डाव्या हातात तलवार व रोमानियन वेशभूषा असलेली लेडी जस्टिस सर्वांच्या नजरेत होती. परंतु आता हि न्याय देवतेची नवीन ओळख सर्वांसमोर आणलेली आहे. त्यामध्ये मुख्यतः न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे व तलवारी ऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे आणि पूर्वी प्रमाणेच उजव्या हातात कायद्याचा तराजु जसा च्या तसा ठेवण्यात आला आहे.!
CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा आपण सर्वांनी भारताला पुढे नेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.